प्रकार २ मधुमेहाचे घरच्या घरी नियंत्रण Diabetes Control At Home For Type 2 Diabetes (Marathi Info)

insulin independent diabetes type 2(Marathi) diabecity.com

प्रकार २ मधुमेहाचे घरच्या घरी नियंत्रण कसे करावे? How to control type-2 diabetes at home?

मधुमेहावर उत्तम नियंत्रण ठेवण्यासाठी तुमचा स्वत:चा वाटाच फार महत्त्वाचा आहे. यामुळे मधुमेहाची सर्व माहिती असणे अत्यंत जरुरी आहे. मधुमेह नियंत्रित करायचा म्हणजे काय करायचे? तर तुमच्या रक्तातली साखर १०० ते १६० या रेंजमध्येच ठेवायची! त्यासाठी आधी आहार आणि व्यायाम यांद्वारे आणि नाही जमल्यास यांच्या जोडीने (डॉक्टरच्या सल्ल्याने) औषधे आणि/किंवा इन्सुलिन यांचा वापर करून रक्तातील ग्लुकोज साखर या रेंजमध्ये ठेवायला हवी. डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे रक्तचाचण्या (ब्लड-टेस्ट) तसेच इतर तपासण्या वेळेवर करणे.

टाईप-२ प्रकारच्या मधुमेहात स्वादुपिंडात इन्सुलिनचं उत्पादन सुरू असतं, पण ते पुरेसं नसतं. जेवढं इन्सुलिन तयार होतं तेही प्रभावी ठरत नाही, कारण शरीराची बोथट इन्सुलिन संवेदनशीलता (ReducedInsulin Sensitivity). संशोधकांचं असं म्हणणं आहे कि शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांची बदललेली जीवनशैली! जंक फूड, वेळी-अवेळी घाईघाईने खाणं, एकसारखं एका जागी बसून काम करणं, घाईगर्दीच्या जीवनात व्यायाम करायला वेळ नसल्यामुळे तो न करणं वगैरे.

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: