मधुमेहाचे निदान Diagnosis Of Diabetes (Marathi)

symptoms Of Diabetes(Marathi) diabecity.com

मधुमेहाचे निदान (Diagnosis) कसे करतात?

आपण मधुमेहाची लक्षणे या भागात पाहिले की सुरुवातीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. तरी सुद्धा तुमच्या घरात/नात्यात कुणाला मधुमेह झालाय का? तुमचे वजन वाढले आहे का? तुमचे वय ३५ पेक्षा अधिक आहे का? तुमची जीवनशैली बैठी आहे का? व्यायामाचा/कष्टाचा अभाव आहे का? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन मधुमेह आहे का हे तपासून घ्या.

मधुमेहाचे निदान कसे केले जाते ते आता पाहूया.

लघवीतील साखरेची तपासणी

लघवीची तपासणी करून मधुमेहाचे ढोबळ निदान करता येते. पण ही पद्धत फारशी विश्वसनीय मानली जात नाही. त्याचे कारण असे की मधुमेह फार पुढच्या टप्प्यावर गेला असेल तरच रक्तातील ग्लुकोज साखर लघवीवाटे शरीराबाहेर जाते. त्यामुळे अशा प्रकारे निदान होईपर्यंत शरीरातील इंद्रियांचे बरेच नुकसान वाढलेल्या साखरेमुळे आलरेडी झालेले असते. लघवीमध्ये साखर नाही सापडली तर मधुमेह झालेला नाही असे समजू नये - रक्ताची तपासणी करावी. लघवीमध्ये साखर सापडली तरी मधुमेह झाला आहे असे ठामपणे सांगता येत नाही, कारण, रुग्णाला जर काही मूत्रपिंडाचा आजार झाला असेल तरी लघवीमध्ये साखर मिळू शकते. यासाठीच लघवीची तपासणी करून मधुमेहाचे निदान करण्याची पद्धत फारशी विश्वसनीय मानली जात नाही. रक्ताची तपासणी करावी.

Diagnosis Of Diabetes(Marathi) diabecity.com

उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची तपासणी

Fasting blood glucose test

ही तपासणी करण्यासाठी रुग्णाला कमीतकमी ८ तास उपाशीपोटी राहणे आवश्यक असते. त्यामुळेच सकाळी उठल्यावर काहीही न खाता रक्ताचा नमुना घेतला जातो. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असेल तर साधारणतः मधुमेह नाही असे समजले जाते. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 100 mg/dL पेक्षा जास्त पण 126 mg/dL पेक्षा कमी असेल तर सौम्य प्रमाणात मधुमेह आहे किंवा मधुमेहाची सुरुवात आहे असे मानले जाते. तथापि ही चाचणी सलग ३ दिवस केल्यास मधुमेहाचे खात्रीपूर्वक निदान करता येते. सौम्य प्रमाणात मधुमेह असेल तर आहार आणि व्यायाम यांच्या सहाय्याने मधुमेह बरीच वर्षे औषधाविना आटोक्यात ठेवता येऊ शकतो.

जेवणानंतर २ तासांनी रक्तातील ग्लुकोज साखरेची तपासणी

Post-prandial blood glucose test

ही तपासणी जेवणानंतर २ तासांनी केली जाते. रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 140 mg/dL पेक्षा कमी असेल तर साधारणतः मधुमेह नाही असे समजले जाते. 140 mg/dL पेक्षा जास्त पण 199mg/dL पेक्षा कमी असेल तर सौम्य प्रमाणात मधुमेह आहे किंवा मधुमेहाची सुरुवात आहे असे मानले जाते. 200mg/dL पेक्षा अधिक असेल तर मधुमेह आहे मानले जाते. तथापि ही चाचणी सलग ३ दिवस केल्यास मधुमेहाचे खात्रीपूर्वक निदान करता येते.

ओरल ग्लुकोज टाॅलरन्स टेस्ट (OGTT)

Oral Glucose Tolerance Test (OGTT)

शरीराची ग्लुकोज साखर वापर करण्याची क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. उपाशीपोटी साखर तपासणीचे निकाल जास्त यायच्या आधीच म्हणजे प्रि-डायबिटीसचे निदान व्हायच्या आधीच शरीराची ग्लुकोज साखर वापरण्याची क्षमता कमी झालेली असू शकते. प्रि-डायबिटीसच्या शक्यतेबरोबरच गर्भवती महिलांना होणारा मधुमेह होण्याची शक्यता तपासण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.

OGTT करून घेण्यासाठी करावयाची तयारी:

OGTT चाचणी करायच्या ३ दिवस आधीपासून पेशंटने साधा समतोल पण जरा जास्त कर्बोदके (carbohydrates) असणारा आहार घ्यावा. दिवसाला कमीतकमी १५० ग्रॅम्स कर्बोदके (carbohydrates) खाल्ली गेली पाहिजेत. यासाठी बटाटे, भात, केळी, गहू यांचा वापर अधिक करावा. चाचणीच्य आधी ८ तास काहीही खाऊ-पिऊ नये, तसेच मद्यपान, धूम्रपान करू नये. फार कष्टाची कामे किंवा व्यायाम करू नये. काही आजार किंवा इतर त्रास असेल तर डॉक्टरांना आधीच सांगावे, डॉक्टर तुम्हाला काही औषधे वगैरे घेण्याची मनाई करू शकतात. या चाचणीला साधारणपणे 4 ते 5 तास लागू शकतात. तुमच्या हालचालीमुळे चाचणीच्या निकालात फरक पडू शकतो. त्यामुळे फारशी हालचाल न करता स्वस्थ बसून राहावे. काही शंका असल्यास डॉक्टरांशी आधीच बोलून घ्यावे.

OGTT Marathi Diagnosis Of Diabetes diabecity.com

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: