मधुमेहाची लक्षणे Symptoms Of Diabetes (Marathi)

symptoms Of Diabetes(Marathi) diabecity.com

मधुमेहाची काय लक्षणे असतात?

अनेकांना असे वाटू शकते की ज्या अर्थी मला मधुमेहाची काही लक्षणे नाहीत त्या अर्थी मला मधुमेह झालेला नाही. पण असे समजणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेतल्यासारखे आहे. मधुमेही व्यक्तीला सुरुवातीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. मग काय करावे? एखाद्याला मधुमेह झालाय की नाही हे कसे ओळखावे? मधुमेहाचे निदान कसे करावे?

खालील गोष्टींवर लक्ष ठेवा:

 1. तुमच्या घरात/नात्यात कुणाला मधुमेह झालाय का? उदा. आई, वडील, भाऊ, बहीण, आत्या, मावशी, आजी, आजोबा वगैरे...
 2. तुमचे वजन वाढले आहे का?
 3. तुमचे वय ३५ पेक्षा अधिक आहे का?
 4. तुमची जीवनशैली बैठी आहे का? व्यायामाचा/कष्टाचा अभाव आहे का?
 5. अलीकडे तुम्हाला खा-खा सुटली आहे का?
 6. तुमच्या जीवनात काही मानसिक ताण-तणाव आहेत का?
 7. अलीकडे तुमची चिड-चिड वाढली आहे का?
 8. विनाकारण थकवा वाटतो का?
 9. जननेंद्रियाला खाज वगैरे येते का (की जी औषधांनी बरी होत नाही)?
 10. शरीराला कुठे जखम/गळू वगैरे आहे का की जे औषधांनी बरे होत नाही?
 11. चष्म्याचा नंबर सतत वाढत चाललाय का?
 12. अंधूक दिसते का? किंवा नजर ठीक नाही का?
 13. घशाला तोंडाला कोरड पडते, किंवा सतत तहान लागते का?
 14. हाता-पायाला मंग्या येतात/बधीरपणा वाटतो का?

वरीलपैकी काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित रक्ताच्या साखरेची तपासणी करून गया.

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: