मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग Yoga and Exercise for diabetes, high blood pressure, high cholesterol, obesity and heart disease(Marathi)

diabetes मधुमेह व्यायाम vyayam marathi exercising cycling couple

या सर्व विकारांसाठी व्यायामाचे काय महत्व आहे?

मधुमेही व्यक्तींना रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी, उच्च कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना ते कमी करण्यासाठी, लठ्ठ व्यक्तींचे वजन कमी करण्यासाठी नियमित आणि पुरेसा व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. व्यायाम करण्याने शरीरातील स्नायू रक्तातील ग्लुकोज साखर अधिक प्रमाणात शोषून घेतात जेणेकरून रक्तातील ग्लुकोजच्या पातळी नियंत्रित केली जाते. व्यायाम करण्याचे इतरही आणे फायदे आहेत. उदा.
  1. रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित होते.
  2. उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.
  3. शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रित राहते.
  4. शरीराचे वजन नियंत्रित राखले जाते.
  5. हाडे मजबूत होतात. त्यामुळे पडल्यावर फ्रॅक्चर होण्याची शक्यता दुरावते.
  6. शरीरातील फॅट (चरबी) चे प्रमाण कमी होते जे की आरोग्यासाठी हितकारक असते.
  7. स्नायूंची टोन (muscle tone) सुधारते.
  8. मानसिक ताण-तणाव कमी होतात.
  9. छान वाटते. (feel-good factor).

व्यायामाचे फायदे मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार या सर्व विकारांसाठी आहेत

मधुमेही व्यक्तींसाठी कोणता व्यायाम चांगला?

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: