मधुमेहासाठी औषध बायग्वानाइड्स (Biguanides) Metformin मेटफॉर्मिन (Glyciphage) ( Diabetes Aushadh Marathi Info )

diabetes मधुमेह औषध मेटफॉर्मिन biguanide metformin glyciphage oral medication aushadh  Marathi (diabecity.com)

बायग्वानाइड्स (Biguanides) मेटफॉर्मिन ( Metformin - Glyciphage Or Glucophage )

बाजारात मेटफॉर्मिन Metformin हे औषध Glyciphage (Franco Indian Remedies), Etformin (Dey's), Glycomet (US Vitamins Limited), Metfor (Cipla), Metlife (Mankind) अशा अनेक नावांनी उपलब्ध आहे.

मेटफॉर्मिन ( Metformin - Glyciphage ) औषधे कशी घ्यावीत? डोस (Dose) काय? दुष्परिणाम (Side Effects) कोणते?

बायग्वानाइड्स या प्रकारातली औषधे (उदा. मेटफॉर्मिन) दोन पद्धतींनी रक्तातील साखर नियंत्रणात आणतात:

  1. यकृतात (liver) तयार होणाऱ्या ग्लुकोज साखरे (glucose) चा वेग (rate of production) कमी करतात. (यामुळे यकृतातून रक्तात कमी प्रमाणात ग्लुकोज साखर येते.)
  2. शरीरातील स्नायू (muscles) आणि इतर पेशीं (cells) चा इन्सुलिन प्रतिरोध (insulin resistance) कमी करतात (यामुळे कमी इन्सुलिनमध्ये काम भागते.)

मेटफॉर्मिन ( Metformin - Glyciphage ) डोस (Dose)

डॉक्टर ठरवतील

आगाऊ काळजी (Precautions)

हे औषध घेण्यापूर्वी तुम्हाला पूर्वी काही श्वसनाचे आजार झाले होते का - उदा. फुफ्फुसाचे विकार, दमा, इ. - किंवा अॅनिमिया विटामिन B12 ची कमतरता, किडनीचे/यकृताचे विकार वगैरे - त्याची आगाऊ कल्पना डॉक्टरांना औषध प्रिस्क्राइब करण्याआधी द्या. मद्यपान टाळा कारण त्यामुळे तुम्हाला लॅक्टिक अॅसिडोसिस नावाचा विकार होऊ शकतो. जास्त लघवीला उद्युक्त करणारी औषधे (डाययूरेटिक्स diuretics) घेत असाल तर, खूप घाम येत असेल किंवा जुलाब/उलट्या वगैरेमुळे शरीरातील पाणी कमी झाले असण्याची शक्यता असेल (dehydration) तर लॅक्टिक अॅसिडोसिसची रिस्क वाढते. वयस्कर रुग्णांना हि रिस्क तुलनेने अधिक असते. त्यामुळे या सर्व गोष्टींची डॉक्टरांना माहिती असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही तणावग्रस्त (टेन्शनखाली ) असाल तर रक्तशर्करा (blood glucose) नियंत्रणात राहणे कठीण असते. तणाव कशा प्रकारचा? तर मानसिक आणि शारीरिक यांपैकी कोणताही! शारीरिक तणावामध्ये ताप, इन्फेक्शन, जखमा किंवा ऑपरेशन केल्यानंतरचा तणावही येतो. या तणावाची डॉक्टरला जरूर कल्पना द्या की ज्यायोगे ते तुमच्या उपचारामध्ये आणि औषधांमध्ये योग्य असे बदल करू शकतील.

 

तुम्ही स्त्री असाल तर गर्भावस्थेत मेटफॉर्मिन (metformin) हे औषध सहसा दिलं जात नाही. त्याऐवजी इन्सुलिन वापरणं अधिक श्रेयस्कर असतं. डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच इन्सुलिन घ्या आणि डोस ठरवून घ्या आणि गरजेप्रमाणे अॅड्जस्ट करा! मासिक पाळीच्या काळातही या औषधाचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा, कारण या औषधाने नको असलेले गरोदरपण उद्भवू शकते. तुम्ही स्त्री असाल आणि गर्भ-प्रतिबंधक गोळ्या घेत असाल तर मेटफॉर्मिन हे औषध डॉक्टरच्या सल्ल्याविना घेऊ नका. तुम्ही बाळाला अंगावर दूध पाजणारी माता असाल तर हे लक्षात घ्या की मेटफॉर्मिन हे औषध दुधातून बाळाच्या शरीरात अल्प प्रमाणात जाऊन त्याच्या आरोग्याला धोका संभवू शकतो.

दुष्परिणाम (Side Effects)

मेटफॉर्मिन ( Metformin - Glyciphage Or Glucophage ) औषधांचे दुष्परिणाम असे असू शकतात: उलट्या, मळमळ, जुलाब, अशक्तपणा, तोंडात एक विचित्र चव (धातूची metallic taste) येते. हे दुष्परिणाम सर्वांनाच होतील असे नाही. हे दुष्परिणाम कालांतराने कमी कमी होत जातात. तसे ते कमी नाही झाले किंवा वाढले तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटून जरूर कळवा. तुमच्या डॉक्टरने हे औषध तुम्हाला घ्यायला सांगितले आहे कारण त्याच्या मते या औषधाचे तुमच्या मधुमेहावरील उपचारात होणारे फायदे हे दुष्परिणामापेक्षा जास्त आहेत असे त्याला वाटल्यामुळे हे लक्षात ठेवा. तथापि, हे दुष्परिणाम लक्षात आल्यावर लगेच डॉक्टरला याची कल्पना द्या. या गटातल्या औषधांच्य दुष्परिणामांची ही यादी परिपूर्ण नाही. तुम्हाला यापेक्षा वेगळे दुष्परिणाम जाणवू शकतात. ते लगेच डॉक्टर आणि फार्मासिस्टच्या लक्षात आणून द्या.

या औषधामुळे सहसा रक्तातली साखर अचानक कमी होत नाही. पण या औषधसोबत इतर औषधे (उदा. सल्फोनिलयुरिया - Daonil, Glimer वगैरे, जे स्वादुपिंडातून अधिक इन्सुलिन निर्माण करविते) असतील (एकाच गोळीमध्ये दोन किंवा तीन वेगवेगळ्या औषधांचे मिश्रण असू शकते किंवा तीन वेगवेगळ्या औषधांच्या गोळ्या घेत असलात ) तर मात्र रक्तातली साखर अचानक कमी होऊ शकते, ज्याला हायपोग्लायसेमियाचा (hypoglycemia) म्हणतात. हायपोग्लायसेमियाची लक्षणे अशी आहेत: अचानक घाम येणे, चक्कर येणे, हातपाय थरथर कापणे, खूप भूक लागणे, हृदयाची धडधड वाढणे, नजर अंधूक होणे, हातापायाला मुंग्या येणे, ओठ आणि जिभेला मुंग्या येणे, चिडचिड होणे इ.

हायपोग्लायसेमिया किंवा हायपो (Hypoglycemia) झाल्यास काय करावे ?

हायपोग्लायसेमियावरील उपाय (How to manage hypoglycemia) आणि महत्वाची सूचना:

लक्षात असू द्या की वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा रक्तातल्या साखरेवर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. अशा वेळी हायपोग्लायसेमिया (hypoglycemia) चा धोका संभवतो. म्हणून एखादे औषध पहिल्यांदा घेत असाल तर गाडी वगैरे चालवण्याआधी ग्लुकोमीटरने साखर तपासून मग गाडी चालवा. सोबत ग्लुकोज साखर, खडीसाखर, पार्ले-जी बिस्किटांचा पुडा किंवा पिकलेली केळी, आंबा, कोल्ड्रिंक, चॉकलेट असे पटकन साखर वाढवणारे पदार्थ नेहमी जवळ बाळगा. अशा वेळी जास्त कोंडा असणारे किंवा साखर हळूहळू वाढवणारे पदार्थ टाळा! उदा. डायजेस्टिव बिस्किटे, डायट कोक, टोमॅटो, भाज्या, तळलेले पदार्थ वगैरे अशावेळी खाऊ नये. ज्या औषधामुळे हायपोग्लायसेमिया होऊन रक्तातली साखर कमी झाली त्या औषधाबद्दल आणि किती डोस घेतला होता ते डॉक्टरला कळवा ज्यायोगे ते तुम्हाला डोस किंवा औषध बदलून देतील किंवा आणखी काही महत्वाचा सल्ला देतील

 

मेटफॉर्मिन ( Metformin) हे बायग्वानाइड्स (Biguanides) या प्रकारातील औषध असून त्यातली वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे अशी आहेत:

Metformin मेटफॉर्मिन जेनेरिक स्वस्त औषधांची यादी:

List of Metformin Cheap Generic Drugs in Marathi

Brand Name Drug Name Company Name Packing Price Rs.
BIGOMET TAB Metformin 250mg GENETICA (ARISTO) 10 4.34
MEFNOR TAB Metformin 250mg NORRIS 10 5.50
GLYCIPHAGE TAB Metformin 250mg FRANCO-INDIAN 10 5.90
ETFORMIN TAB Metformin 500mg DEY'S 10 6.00
FORMINAL TAB Metformin 500mg ALEMBIC 10 6.45
GLUMET TAB Metformin 500mg CIPLA 10 6.96
BIGOMET TAB Metformin 500mg GENETICA (ARISTO) 10 7.45
GLYCOMET TAB Metformin 250mg USV 10 7.90
GLUMET-XR TAB Metformin 500mg CIPLA 10 8.29
MEFNOR TAB Metformin 500mg NORRIS 10 8.80
DIAMET TAB Metformin 500mg BAL PHARMA 10 9.50
FORMIN TAB Metformin 500mg ALKEM 10 9.50

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: