प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) Pre-Diabetes OR Borderline Diabetes
(Marathi Info)

insulin independent diabetes type 2(Marathi) diabecity.com

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस म्हणजे काय?

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस असणे ही तुमच्या आरोग्याशी निगडीत धोक्याची घंटा आहे. तुम्हाला प्रि-डायबिटीसचे निदान झाले असेल तर तुम्ही उंबरठा ओलांडलेला आहे पण फार उशीर झालेला नाही, कारण पुढे होऊ शकणारी डायबिटीस ही व्याधी टाळता येण्याची किंवा लांबणीवर टाकण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. तातडीनं उपाययोजना केलीत तर होणारा मधुमेह अनेक वर्षे लांबणीवर टाकता येईल.

आपल्यापैकी अनेकांची जीवनशैली बैठी असते, ऑफिसात, दुकानात, गाडीत कुठेही आपण 'काम' करत असलो तरी ते बैठंच काम असतं. मेहनत, कष्ट यांचा अभाव असतो. उठता बसता फरसाण, चकल्या, बिस्कीटं यांचं गुऱ्हाळ चालूच असतं! सगळं लक्ष पैसे कमावण्यावर असतं, पण ज्या शरीरामुळे आपलं अस्तित्व असतं, त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ नसतो. आणि आपल्या ह्या अशा वागण्यानेच भारताला हल्ली "डायबेटीसची जागतिक राजधानी" असं नको असलेलं विशेषण मिळतंय. बॉर्डरलाईन डायबेटीस या गोंडस नावाला भुलून अनेक जण दुर्लक्ष करून जंक फूड खात असतात आणि व्यायाम टाळतात. असे करू नये.

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस आहे हे कसे तपासावे : उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची तपासणी

How to diagnose Pre-diabetes: (info in Marathi
Fasting blood glucose test

ही तपासणी करण्यासाठी रुग्णाला कमीतकमी ८ तास उपाशीपोटी राहणे आवश्यक असते. त्यामुळेच सकाळी उठल्यावर काहीही न खाता रक्ताचा नमुना घेतला जातो. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असेल तर साधारणतः मधुमेह नाही असे समजले जाते. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 100 mg/dL पेक्षा जास्त पण 126 mg/dL पेक्षा कमी असेल तर प्रि-डायबिटीस आहे (किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस किंवा सौम्य प्रमाणात मधुमेह आहे) किंवा मधुमेहाची सुरुवात आहे असे मानले जाते.

जेवणानंतर २ तासांनी रक्तातील ग्लुकोज साखरेची तपासणी

Post-prandial blood glucose test

ही तपासणी जेवणानंतर २ तासांनी केली जाते. रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 140 mg/dL पेक्षा कमी असेल तर साधारणतः मधुमेह नाही असे समजले जाते. 140 mg/dL पेक्षा जास्त पण 199mg/dL पेक्षा कमी असेल तर प्रि-डायबिटीस आहे (किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस किंवा सौम्य प्रमाणात मधुमेह आहे) किंवा मधुमेहाची सुरुवात आहे असे मानले जाते.

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीससाठी उपाययोजना

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस (सौम्य प्रमाणात मधुमेह) असेल तर आहार आणि व्यायाम यांच्या सहाय्याने मधुमेह बरीच वर्षे औषधाविना आटोक्यात ठेवता येऊ शकतो.

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: