प्रकार २चा मधुमेह किंवा टाईप टू डायबिटीस किंवा इन्सुलिनवर अवलंबून नसलेला मधुमेह Type 2 OR Insulin Independent Diabetes (Marathi Info)

insulin independent diabetes type 2(Marathi) diabecity.com

प्रकार २ चा मधुमेह म्हणजे काय?

इन्सुलिनवर अवलंबून नसलेला किंवा प्रौढांचा मधुमेह [दुसऱ्या प्रकारचा मधुमेह: टाईप 2 डायबिटीस] (Insulin independent diabetes mellitus OR Type-2 Diabetes)

साधारणपणे वयाच्या ४० वर्षांनंतर प्रकार २ चा मधुमेह आढळून येतो. अलीकडे ही वयोमर्यादा पास्तीशीपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३५-३६ वर्षांच्या तरुणांमध्ये, विशेष करून IT क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या तरुणांमध्ये, मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे असे अनेक पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. मात्र बरीच वर्षे त्याचे निदान होत नाही, कारण, लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात.

टाईप-२ प्रकारच्या मधुमेहात स्वादुपिंडात इन्सुलिनचं उत्पादन सुरू असतं, पण ते पुरेसं नसतं. जेवढं इन्सुलिन तयार होतं तेही प्रभावी ठरत नाही, कारण शरीराची बोथट इन्सुलिन संवेदनशीलता (ReducedInsulin Sensitivity). संशोधकांचं असं म्हणणं आहे कि शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांची बदललेली जीवनशैली! जंक फूड, वेळी-अवेळी घाईघाईने खाणं, एकसारखं एका जागी बसून काम करणं, घाईगर्दीच्या जीवनात व्यायाम करायला वेळ नसल्यामुळे तो न करणं वगैरे.

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: