मधुमेहाचे प्रकार Types Of Diabetes (Marathi)

मधुमेहाचे प्रकार कोणकोणते आहेत?
मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. अमेरिकेच्या मधुमेह संघटनेने (American Diabetes Association किंवा ADA ने) खालील प्रकार मान्य केले आहेत.
३) गर्भारपणातला मधुमेह किंवा गरोदरपणातला मधुमेह(Gestational Diabetes Marathi Info)
४) युवास्थेतला मधुमेह (Maturity Onset Diabetes of the Youth किंवा MODY Marathi Info)
५) भारतीय उपखंडात आणखी एक खास प्रकारचा मधुमेह आहे: कुपोषणाशी संबंधित मधुमेह
प्रकार १ इन्सुलिनवर अवलंबून असलेला मधुमेह (Insulin dependent diabetes mellitus OR Type-1 Diabetes)
हा लहान वयात अचानक होणारा असा मधुमेहाचा प्रकार आहे. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. इन्सुलिनच नसल्यामुळे पेशींना ग्लुकोज साखर मिळत नाही, त्यामुळे ती रक्तातच साठून राहते आणि वाढत जाते. रक्तातील ग्लुकोजचा शरीराला उपयोग करून घेण्यासाठी रुग्णांना नेहमी इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते. मधुमेहाच्या या प्रकाराला मुलांचा मधुमेह असे म्हणतात. कारण हा लहान मुलांमध्ये किंवा १८ ते २० वर्षाच्या आतील कुमारांमध्ये आढळतो. साधारणपणे याचे प्रमाण दहा टक्के असते. स्वादुपिंडामधील बीटा पेशी नष्ट झाल्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन बंद होते, म्हणून रुग्णांना नेहमी इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते. या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील इम्यून सिस्टीम सदोष असते. जीवाणू आणि विषाणू यापासून शरीराला संरक्षण देणारी यंत्रणा शरीरातील स्वादुपिंडाच्या पेशींवरच हल्ला करून त्यांना नष्ट करते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही.
प्रकार २ इन्सुलिनवर अवलंबून नसलेला मधुमेह (Insulin independent diabetes mellitus OR Type-2 Diabetes)
साधारणपणे वयाच्या ४० वर्षांनंतर प्रकार २ चा मधुमेह आढळून येतो. अलीकडे ही वयोमर्यादा पास्तीशीपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३५-३६ वर्षांच्या तरुणांमध्ये, विशेष करून IT क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या तरुणांमध्ये, मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे असे अनेक पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. मात्र बरीच वर्षे त्याचे निदान होत नाही, कारण, लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात.
टाईप-२ प्रकारच्या मधुमेहात स्वादुपिंडात इन्सुलिनचं उत्पादन सुरू असतं, पण ते पुरेसं नसतं. जेवढं इन्सुलिन तयार होतं तेही प्रभावी ठरत नाही, कारण शरीराची बोथट इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity). संशोधकांचं असं म्हणणं आहे कि शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांची बदललेली जीवनशैली! जंक फूड, वेळी-अवेळी घाईघाईने खाणं, एकसारखं एका जागी बसून काम करणं, घाईगर्दीच्या जीवनात व्यायाम करायला वेळ नसल्यामुळे तो न करणं वगैरे.