डायबिटीस होण्याची कारणे: मधुमेह कुणाला होऊ शकतो? Who is at risk for diabetes? (Marathi Info)

insulin independent diabetes type 2(Marathi) diabecity.com

टाईप २ डायबिटीस किंवा दुसऱ्या प्रकारचा मधुमेह कुणाला होऊ शकतो?

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह दोन कारणांनी होऊ शकतो.

  1. इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार न होणे
  2. शरीराचे वजन आणि खाणे (बॉडी साईज आणि इनटेक) वाढल्याने इन्सुलिन शरीरातील पेशींना वापरता न येणे. (इन्सुलिनचे पेशींवरील रिसेप्टर्स इन्सुलिनला दाद देत नाहीत.)
वरीलपैकी कोणत्याही एक किंवा दोन्ही कारणांनी प्रौढांचा किंवा टाईप २ चा डायबेटिस होऊ शकतो. आता यातल्या दुसऱ्या कारणावर आहार कमी करण्याने व व्यायाम वाढवल्याने इलाज होऊ शकेल पहिल्या कारणांकरता आहाराबरोबरच इतरही उपाययोजना कराव्या लागतील. उदा. बाहेरून इन्सुलिन घेणे, इन्सुलिनचे सिक्रीशन वाढवणारी औषधे घेणे हे पहिल्या कारणासाठी तर रिसेप्टर्सना उत्तेजित करणारी औषधे दुसऱ्या कारणासाठी. डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देऊन उपाययोजना करतील.

आपल्यापैकी अनेकांची जीवनशैली बैठी असते, ऑफिसात, दुकानात, गाडीत कुठेही आपण 'काम' करत असलो तरी ते बैठंच काम असतं. मेहनत, कष्ट यांचा अभाव असतो. उठता बसता फरसाण, चकल्या, बिस्कीटं यांचं गुऱ्हाळ चालूच असतं! सगळं लक्ष पैसे कमावण्यावर असतं, पण ज्या शरीरामुळे आपलं अस्तित्व असतं, त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ नसतो. आणि आपल्या ह्या अशा वागण्यानेच भारताला हल्ली "डायबेटीसची जागतिक राजधानी" असं नको असलेलं विशेषण मिळतंय. बॉर्डरलाईन डायबेटीस या गोंडस नावाला भुलून अनेक जण दुर्लक्ष करून जंक फूड खात असतात आणि व्यायाम टाळतात. असे करू नये.

ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांना तो टाळता येतो का?

How to prevent diabetes in high risk group? (info in Marathi)

ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांना तो लांबणीवर नक्कीच टाकता येतो. योग्य आहार, व्यायाम आणि मनोविकारांचे नियोजन करून १० वर्षे किंवा अधिक काल मधुमेह पुढे ढकलता येऊ शकतो असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु ज्यांचा आनुवंशिक फॅक्टर स्ट्राँग असतो, त्यांना तो टाळणे खूप अवघड असते. टाळता आला नाही तरी अशा लोकांनी योग्य आहार, व्यायाम आणि मनोविकारांचे नियोजन करून मधुमेहाला उत्तम प्रकारे आटोक्यात ठेवून अगदी ८०-९० वर्षेही चांगले जगता येते.

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: